महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तलाठी भरती घोटाळ्याबाबत विधानभवनासारख्या पावित्र्य वास्तूत ढळढळीत खोटं बोलले आहेत.
प्रश्न. क्र. (४) चे उत्तर देताना मंत्री महोदय खोटं बोलले आहेत : तलाठी भरती घोटाळ्यात अनेक संघटित टोळ्या कार्यरत होत्या इतकाच काय तर TCS ION परीक्षा केंद्राचा पर्यवेक्षक सुध्दा यात सामील होता. अनेक परीक्षा केंद्रावर तलाठीचे पेपर फुटले आहेत, त्याबद्दलच्या FIR, चार्जशीट कॉपी आणि इतर पुरावे आमच्याकडे आहेत. असे पुरावे आहेत जे आम्ही समजमाध्यामांवर जाहीर करू शकत नाही, पण काही पुरावे याचिकेत जोडले आहेत आणि येणाऱ्या काळात अधिकचे पुरावे याचिकेत जोडले जाणार आहेत. तलाठी भरती घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता असल्याने आधी या घोटाळ्याची न्यायालयीन SIT चौकशी करावी त्यानंतरच निकाल जाहीर करावा अशी मागणी आम्ही उच्च न्यायलायात पण केली आहे.
महसूल मंत्र्यांनी सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि तलाठीचा निकाल जाहीर न करता SIT चौकशीची मागणी पूर्ण करावी.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Leave a Reply