majhyakavita
पुर्व परिक्षेची पत्रिका परीक्षेपूर्वीच देण्याबाबतचा विद्यार्थ्यांना फोन ४० लाख रुपयांची केली मागणी.
♦️नियुक्त्या दिल्यानंतरही, “घोटाळ्यांमुळे” पदभरती रद्द होऊ शकते का? याचं उत्तर खालील बातमीत आहे.
नियुक्त्या दिल्यानंतरही, “घोटाळ्यांमुळे” पदभरती रद्द होऊ शकते का? याचं उत्तर खालील बातमीत आहे.
उत्तरप्रदेशात UP जल निगम साठी, ८५४ इंजिनिअर आणि ३३५ लिपिक भरतीत घोटाळा झाला. उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या, त्यांना नोकरीवर रुजू होऊन वर्ष झालं पण नंतर घोटाळ्याचा तपास SIT कडे गेला. प्रामाणिक आणि घोटाळेबाज कोण हे शोधणे शक्य नसल्याचे SIT ने रिपोर्ट दिला आणि संपूर्ण पदभरती रद्द करण्यात आली. असे अनेक राज्यातील उदाहरणे आहेत.
त्यामुळे निकाल लागला म्हणून आणि नियुक्त्या झाल्या तरी काही फरक पडणार नाही, एकदा SIT चौकशी झाल्यास केव्हाही पदभरती रद्द होऊ शकते. आपल्याला याचा पाठपुरावा रस्त्यावर आणि कायदेशीर मार्गाने सुरूच ठेवावा लागणार आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
♦️ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तलाठी भरती घोटाळ्याबाबत विधानभवनासारख्या पावित्र्य वास्तूत ढळढळीत खोटं बोलले आहेत.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तलाठी भरती घोटाळ्याबाबत विधानभवनासारख्या पावित्र्य वास्तूत ढळढळीत खोटं बोलले आहेत.
प्रश्न. क्र. (४) चे उत्तर देताना मंत्री महोदय खोटं बोलले आहेत : तलाठी भरती घोटाळ्यात अनेक संघटित टोळ्या कार्यरत होत्या इतकाच काय तर TCS ION परीक्षा केंद्राचा पर्यवेक्षक सुध्दा यात सामील होता. अनेक परीक्षा केंद्रावर तलाठीचे पेपर फुटले आहेत, त्याबद्दलच्या FIR, चार्जशीट कॉपी आणि इतर पुरावे आमच्याकडे आहेत. असे पुरावे आहेत जे आम्ही समजमाध्यामांवर जाहीर करू शकत नाही, पण काही पुरावे याचिकेत जोडले आहेत आणि येणाऱ्या काळात अधिकचे पुरावे याचिकेत जोडले जाणार आहेत. तलाठी भरती घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता असल्याने आधी या घोटाळ्याची न्यायालयीन SIT चौकशी करावी त्यानंतरच निकाल जाहीर करावा अशी मागणी आम्ही उच्च न्यायलायात पण केली आहे.
महसूल मंत्र्यांनी सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि तलाठीचा निकाल जाहीर न करता SIT चौकशीची मागणी पूर्ण करावी.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
तलाठी भरती घोटाळ्याची नवीन अपडेट :
तलाठी भरती घोटाळ्याची नवीन अपडेट :
तलाठी भरतीचा पेपर संभाजीनगर येथील TCS ION केंद्रातील पर्यवेक्षकाने उमेदवारांना उत्तरे पुरविली होती. नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून तलाठीचा पेपर फोडून या पर्यवेक्षकाला प्रश्न पाठविण्यात आली होती. नागपूर मधून अजून नक्की किती परीक्षा केंद्रावर पेपर फोडून इतरत्र पाठविण्यात आला होता?
नाशिक येथील परीक्षा केंद्रावर गणेश गुसिंगे या अट्टल पेपरफोड्याने तलाठीचा पेपर फोडला होता, त्याचे चार्जशीट मागील आठवड्यापर्यंत दाखल करण्यात आले नव्हते.
म्हणजे या घोटाळ्याच्या मुळापर्यंत कोण होते,ही साखळी नक्की कोणापर्यंत पोचत आहे याबद्दल सर्वसामान्य उमेदवारांना काहीही माहिती नाही. जर घोटाळ्याचा तपासच अजून अपूर्ण आहे तर निकाल कशाचा जाहीर करताय? घोटाळेबाजाची निवड झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची?
मुंबई उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. महसूल विभागाने घोटाळ्याचा काय तपास झाला,किती आरोपी/उमेदवार सामील आहेत याबद्दल जाहीरनामा प्रसिद्ध करावा. घोटाळ्याची चौकशी न्यायालयीन SIT मार्फत करवून घ्यावी नंतरच निकाल जाहीर करावा.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य