तलाठी भरती घोटाळ्याची नवीन अपडेट :
तलाठी भरतीचा पेपर संभाजीनगर येथील TCS ION केंद्रातील पर्यवेक्षकाने उमेदवारांना उत्तरे पुरविली होती. नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून तलाठीचा पेपर फोडून या पर्यवेक्षकाला प्रश्न पाठविण्यात आली होती. नागपूर मधून अजून नक्की किती परीक्षा केंद्रावर पेपर फोडून इतरत्र पाठविण्यात आला होता?
नाशिक येथील परीक्षा केंद्रावर गणेश गुसिंगे या अट्टल पेपरफोड्याने तलाठीचा पेपर फोडला होता, त्याचे चार्जशीट मागील आठवड्यापर्यंत दाखल करण्यात आले नव्हते.
म्हणजे या घोटाळ्याच्या मुळापर्यंत कोण होते,ही साखळी नक्की कोणापर्यंत पोचत आहे याबद्दल सर्वसामान्य उमेदवारांना काहीही माहिती नाही. जर घोटाळ्याचा तपासच अजून अपूर्ण आहे तर निकाल कशाचा जाहीर करताय? घोटाळेबाजाची निवड झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची?
मुंबई उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. महसूल विभागाने घोटाळ्याचा काय तपास झाला,किती आरोपी/उमेदवार सामील आहेत याबद्दल जाहीरनामा प्रसिद्ध करावा. घोटाळ्याची चौकशी न्यायालयीन SIT मार्फत करवून घ्यावी नंतरच निकाल जाहीर करावा.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
Leave a Reply